पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना किमान पद्म भूषण पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पार पडली आणि मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोर तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे.
ज्ञानेश कुमारांना पद्म भूषण देण्याची भाजप नेत्याची मागणी
Source: Deshdoot