अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रभर गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटीवर भेट देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. मुंबई पोलीस व महापालिकेच्या व्यवस्थेचं कौतुक करत सर्व मिरवणुका शांततेत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणरायाकडे सुबुद्धी यावी व कुबुद्धीचं विसर्जन व्हावं, अशी प्रार्थना त्यांनी केली.
गिरगाव चौपाटीवर फडणवीस, विसर्जन व्यवस्थेचा आढावा
Source: Lokshahi Marathi