१३ कोटी मतदार वगळल्याची एसआयटी चौकशी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात

१३ कोटी मतदार वगळल्याची एसआयटी चौकशी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली: देशभरातील सुमारे १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बहुमताचा सल्ला न घेता घेतलेले निर्णय आणि सॉफ्टवेअरमधील बदल असंवैधानिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच फॉर्म ६ मधील अनधिकृत बदल रद्द करून जुना नियम लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies