पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे विसर्जन आज भक्तिमय वातावरणात पार पडले. कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी ९.३० वाजता निघाली, तर केसरीवाडा गणपतीची मिरवणूक १०.३० वाजता निघाली. मुंबईत लालबागच्या राजाचे विसर्जन पारंपरिक मार्गाने होणार असून, मुंबईच्या राजाचे हे ९९ वे वर्ष आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात
Source: Lokshahi Marathi