लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मान कोळी बांधवांकडेच; विलंबाची शक्यता

लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मान कोळी बांधवांकडेच; विलंबाची शक्यता

लालबागच्या राजाचे विसर्जन यंदाही कोळी बांधवांच्या हातूनच होणार असून, गिरगाव चौपाटीवर राजा दाखल झाला आहे. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने तराफा पाण्याच्या पातळीपर्यंत न पोहोचल्यास विसर्जन दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत लांबू शकते. गेल्या वर्षी भरतीमुळे विसर्जनाला 33 तास उशीर झाला होता; यंदा कोळी बांधवांनी भरती-ओहोटीचा अभ्यास करून नवीन तराफ्याची व्यवस्था केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies