राजकोटमधील भक्तिनगर सर्कल येथे गुरुवारी दुपारी 27 वर्षीय दलित तरुण विमल वाणिया याची चाकूने वार करून हत्या झाली. पत्नीचा भाऊ कमलेश घांघल आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात हत्या व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तिघेही फरार आहेत. आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध असल्याने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजकोटमध्ये दलित तरुणाची चाकूने हत्या
Source: BBC Marathi