मुंबईच्या प्रभादेवीत अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव होंडा सिटी कार घुसल्याने चार जण जखमी झाले. 'केजी मार्गचा राजा' मंडळाच्या मिरवणुकीत ही घटना घडली. पोलिसांनी चालक प्रणव राकेश अग्रवाल (२१) याला ताब्यात घेतले असून कार जप्त केली आहे. दोन जखमींवर केईएम रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रभादेवीत विसर्जन मिरवणुकीत कार घुसली, चार जखमी
Source: Jai Maharashtra News