महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून सुमारे १५ कोटी रुपये किमतीचं ९.४० किलो विदेशी सोनं जप्त केलं आणि तिघांना अटक केली. सोन्याची भुकटी दूध पावडर, ओट्स, पीठ आणि न्युटेला यांसारख्या खाद्यपदार्थांत मिसळून पाकिटांत लपवली होती. तिघेही एका तस्करी टोळीचे कुरिअर असल्याची कबुली दिल्याचं सांगितलं जात असून DRI टोळीच्या नेटवर्कचा तपास करत आहे.
मुंबई विमानतळावर ९.४० किलो सोनं जप्त; तिघे अटकेत
Source: Prahaar