नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने पंचवटी-मखमलाबाद रोडवरील घाडगे नगर परिसरात सापळा रचून गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून तीन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचवटी पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सणासुदीच्या दिवसांतील ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.
नाशिकमध्ये शस्त्रविक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात
Source: Prahaar