महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, गावपातळीवर तीन सदस्यीय समिती नुकसानीचे प्रमाण ठरवणार आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पंचनाम्यांना सुरुवात
Source: Sarkarnama