मुंबई महापालिकेच्या 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियानांतर्गत दादरच्या एम. सी. जावळे मार्गावर धडक कारवाई करण्यात आली. जी/उत्तर विभागाने ६ अनधिकृत स्टॉल, ५६ ओटे आणि ९ झाडांभोवतीचे चौथरे हटवले. दुकानांच्या वाढीव बांधकामांवरही हातोडा मारला. यामुळे रस्ता व पदपथ मोकळे होऊन पादचाऱ्यांना सुरक्षित व सुलभ वाट मिळाली आहे.
दादरच्या एम. सी. जावळे मार्गावर ५६ ओटे आणि ६ स्टॉल हटवले
Source: Prahaar