मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा गणपती अनंत चतुर्दशीनंतरही मंडपात विराजमान आहे. यंदा २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीला तो विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडेल आणि ३० सप्टेंबरला वर्सोवा येथे विसर्जन होईल. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची ही परंपरा नवसाशी जोडलेली असून, अंधेरीचा राजा 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे.
अंधेरीचा राजा २९ सप्टेंबरला विसर्जनासाठी निघणार
Source: Prahaar