राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच एनडीएसोबत जाण्याचा निर्णय झाला; आम्ही कालही, आजही आणि भविष्यातही एनडीएसोबतच राहू. शरद पवारांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून 'ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे' अशी भूमिका मांडली होती.
एनडीएसोबतच राहणार, विलीनीकरणावर तटकरे यांची भूमिका
Source: Prahaar