आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे आरोप पुढे आले आहेत. साहिलला जातिवाचक शिवीगाळ व जाच केल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांत दिली असून चौकशी सुरू आहे. माजी विद्यार्थ्यांनीही फॅकल्टीकडून सूक्ष्म भेदभाव आणि टोमणे मारले जात असल्याचा अनुभव सांगितला.
आयआयटीत आरक्षित विद्यार्थ्यांवर जातीय भेदभावाचे आरोप
Source: BBC Marathi