भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपचा वाढता जनाधार हीच काँग्रेसची खरी पोटदुखी असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयुक्तांनी सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे स्पष्ट केल्याने राहुल गांधींचा 'फेक नॅरेटिव्ह' उद्ध्वस्त झाला. ईव्हीएम आणि एसआयआरवरून आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न चुकीचा असून जनताच योग्य उत्तर देईल, असे दानवे म्हणाले.
राहुल गांधींवर दानवेंचा हल्ला; निवडणूक आयोगावरील आरोप फेटाळले
Source: Sarkarnama