नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक प्रदेशाचा सर्वंकष विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर झाला. 2036 पर्यंत अर्थव्यवस्था 200 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य असून 58 प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगारांचे नियोजन आहे. सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे व पर्यावरण संरक्षण ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
पुणे आर्थिक प्रदेशासाठी 2036 पर्यंतचा मास्टरप्लॅन जाहीर
Source: Prahaar