मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीला सहा महिन्यांत सुधारणा व कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. निधी उभारणी, लेखांकन आणि संसाधनांचे कार्यक्षम विनियोजन या तीन आघाड्यांवर वेगाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. चार टक्के व्याजाने निधी गुंतवून आठ ते नऊ टक्क्यांनी कर्ज घेण्याची विसंगती दूर करण्यावरही भर देण्यात आला.
राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सहा महिन्यांत कृती आराखडा
Source: Prahaar