अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दुष्काळाचा मुद्दा पुढे करून स्वतःचा राजकीय अजेंडा राबवणे योग्य नाही, अशी अप्रत्यक्ष टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली. बिनविरोध निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शिंदे यांनी व्यापक सहमतीची आवश्यकता व्यक्त केली.
दुष्काळाच्या मुद्द्यावरून जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वाद
Source: Deshdoot