शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारांच्या नव्याने अभ्यासासाठी 'सह्याद्री फार्म्स' व शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून 'शरद जोशी फेलोशिप' सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि २५ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. सात ते आठ महिन्यांच्या फेलोशिपसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य व कमाल २५ हजार रुपयांपर्यंत प्रवासखर्च मिळणार आहे. अर्जाची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर २०२६ आहे.
शरद जोशी फेलोशिपसाठी अर्ज मागवले
Source: Agrowon