अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची गेल्या आठवड्यात अमेरिकेत भेट झाली. बारा महिन्यांतील ही तिसरी भेट असून, दोन्ही देशांवरील आयातकर कमी करण्यासह व्यापार व गुंतवणुकीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते. तैवान, रशिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत. दोन्ही नेते आशिया-पॅसिफिक व जी-२० बैठकीत पुन्हा भेटणार आहेत.
ट्रम्प-जिनपिंग भेटीत व्यापार तणाव कमी करण्यावर सहमती
Source: Max Maharashtra