मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त महामोर्चाची घोषणा केली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास परिसरातून सकाळी १० वाजता सुरू होणारा मोर्चा सीएसएमटी परिसरातील मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल. मतदारयादीच्या SIR प्रक्रियेवरील आक्षेप आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहे.
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा
Source: Lokshahi Marathi