ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या मुंबईतील बैठकीत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा एक रुपये दरात उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. महाज्योतीसाठी ३०० कोटी निधी, वसतीगृह योजना व परदेशी शिष्यवृत्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची सूचना झाली. बैठकीत ओबीसी महामंडळाला सुविधा व क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवनासाठी २०० कोटींची तरतूद यासह विविध मागण्यांवर चर्चा झाली.
ओबीसी विकासासाठी एक रुपयात जागा देण्याचे निर्देश
Source: Prahaar