महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत माजी अग्निवीरांना गट-क गणवेशधारी सेवांमध्ये १०% समांतर आरक्षण देण्यासह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदे, वैरण विकास धोरण, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या २,७६१ पदांना मान्यता मिळाली. सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे ५६ वर्षांनंतर फेरवाटप, नागपुरातील 'स्मार्ट व्हिलेज' गृहप्रकल्प आणि लॉजिस्टिक्स धोरणातील सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय; अग्निवीरांना १०% आरक्षण
Source: Prahaar