निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ४ तारखेला मुंबईत ठाकरे बंधूंकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा बडतर्फ करावे लागेल, असे म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे.
ज्ञानेश कुमारांविरोधात ४ तारखेला मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा
Source: Lokshahi Marathi