गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने फिल्मसिटीची जागा ताब्यात घेतली आहे. बोगदा खोदकामातील गाळ व टीबीएमचे सुटे भाग साठवण्यासाठी जोश व जोकर मैदानेही तात्पुरती घेतली असून, मार्च २०२९ पर्यंत १८ टक्के जीएसटीसह वार्षिक ५.४७ कोटी रुपये भाडे दिले जाईल. १२.२० किमी लांबीचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ ९० वरून २० मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे.
जीएमएलआरसाठी फिल्मसिटीची जागा ताब्यात; बीएमसीला वार्षिक ५.४७ कोटी भाडे
Source: Prahaar