१ ऑक्टोबर २०२६ पासून बँकांना बल्क फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर दररोज वेबसाइटवर जाहीर करावे लागणार आहेत. कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत, १० मिनिटांच्या अतिरिक्त मुदतीसह, हे दर अपडेट करावे लागतील. साधारण ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवींना बल्क डिपॉझिट मानले जाते. यामुळे व्याजदरांत पारदर्शकता व एकसमानता येईल आणि शाखांमधील मनमानी दरांना मर्यादा येईल.
बल्क एफडीवर दररोज व्याजदर जाहीर करण्याचा RBI नियम
Source: Prahaar