गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पासाठी चित्रनगरी महामंडळाने मुंबई महानगरपालिकेकडे २० कोटी ८ लाख ३० हजार ६७७ रुपयांची भरपाई मागितली आहे. प्रकल्पामुळे चित्रीकरण मैदाने प्रभावित झाली असून, जोश मैदान व जोकर मैदान तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी दिली आहेत. १२.२० कि.मी. लांबीचा हा प्रकल्प पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडून प्रवासाचा कालावधी ९० वरून २० मिनिटांपर्यंत कमी करेल.
जीएमएलआर प्रकल्पासाठी फिल्मसिटीला २० कोटींची मागणी
Source: Prahaar