महाराष्ट्रातील भरती परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सने आतापर्यंत सुमारे 1,500 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असून 30 हजार सूचना ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरनंतर कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबईत चर्चा झाली. टास्क फोर्स अध्यक्ष व्ही. राधा यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या भावना आणि सूचनांचा सकारात्मक विचार करून अहवाल सादर केला जाईल.
भरती परीक्षा सुधारण्यासाठी टास्क फोर्सकडून विद्यार्थ्यांशी संवाद
Source: Prahaar