महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'लोकशाही संवाद २०२६' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत महत्त्वाची घोषणा केली. २ ऑक्टोबरपासून राज्यातील उपकेंद्र स्तरावरही ओपीडी सुरू करण्यात येणार असून नागरिकांना मोफत दर्जेदार औषधे व आरोग्यसेवा मिळणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत आयुष्मान भारत अंतर्गत कव्हर होणाऱ्या आजारांची संख्या १३५० वरून २३९९ झाली आहे.
आरोग्यमंत्री आबिटकर यांची आरोग्यसेवेविषयी मोठी घोषणा
Source: Lokshahi Marathi