ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळी झाडून हत्या झाली. कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आरोपींची नावे एफआयआरमध्ये नोंदवल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलिसांशी चर्चा करून पूरक एफआयआर व संशयितांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळी झाडून हत्या
Source: Lokshahi Marathi