ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर कार्यालयाबाहेर हल्ला करून गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य तीन ते चार आरोपींचा शोध सुरू आहे. कुटुंबीयांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.
ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळीबारात हत्या
Source: Lokshahi Marathi