शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक शहर पोलिसांनी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संशयित शाळांवर ११ विशेष पथकांमार्फत धडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक विभागातील ८४१ संशयित आयडींपैकी ६३८ जळगाव जिल्ह्यातील असल्याचा प्राथमिक दावा आहे. मार्च २०२५ मध्ये दाखल गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून १,२०० हून अधिक संशयितांची नावे समोर आली आहेत.
शालार्थ आयडी घोटाळा: नाशिक विभागात ११ पथकांची धडक
Source: Prahaar