मनोरी-गोरई किनाऱ्याजवळ चार महिन्यांपासून अडकलेल्या परदेशी जहाजावर चोरीसाठी गेलेल्या चौघांचा विषारी वायूच्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाला. गॅस पाईपलाईन कापताना ही गळती झाली. पोलिस व मर्चंट नेव्हीने हेलिकॉप्टरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. गोरई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, परदेशात फरार जहाजमालकावरही गुन्हा दाखल झाला आहे.
मनोरीजवळ अडकलेल्या जहाजावर चोरीचा प्रयत्न; विषारी वायू गळतीने चौघांचा मृत्यू
Source: Prahaar