नाशिकच्या येवला तालुक्यातील वाईबोथी गावात साई मातोश्री स्टोन क्रशर परिसरात धडक कारवाई करून पोलिसांनी ५ हजार ६५ जिलेटीन कांड्या आणि १ हजार ५९५ डिटोनेटर जप्त केले. शासकीय परवानगीशिवाय खदाणीच्या कामासाठी हा साठा केल्याचे समोर आले आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून भगवान सुरेश वाघ याला अटक झाली, तर दोन संशयित फरार आहेत.
येवल्यात ५ हजारांहून अधिक जिलेटीन कांड्या जप्त
Source: Sarkarnama