पाथरी तालुक्यातील रेणापूर येथे डीपी दुरुस्ती करताना वीजपुरवठा बंद करण्याचे परमिट घेतल्यानंतरही अचानक प्रवाह सुरू झाल्याने ३५ वर्षीय ज्ञानेश्वर गोरे यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याखाली झिरो लाइनमन म्हणून काम करणाऱ्या गोरे यांना डीपीवरून खाली उतरविण्यात आले. ग्रामस्थांनी परमिट प्रक्रियेची चौकशी व कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली.
डीपी दुरुस्तीदरम्यान विजेचा धक्का, कर्मचाऱ्याचा मृत्यू
Source: Pudhari