मुंबईत 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस' आणि 'अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६'च्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी केवळ स्वाभिमानाची न राहता ज्ञानाची भाषा बनविण्याची गरज व्यक्त केली. एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश आणि जैवतंत्रज्ञानात मराठीसाठी व्यवस्था तसेच डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात मराठी आशय निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
मराठीला ज्ञान भाषा बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक - मुख्यमंत्री फडणवीस
Source: Prahaar