मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करत AI, डिजिटल माध्यमं आणि शिक्षणात मराठीचा वापर वाढवण्याचं आवाहन केलं. मराठी जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचा अधिक विकास आणि बोलीभाषांचं जतन करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.
मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी AI वापर वाढवा: फडणवीस
Source: Lokshahi Marathi