मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापसह हजारो कार्यकर्त्यांनी तिरंगा घेऊन सहभाग घेतला. मोर्चाचे नंतर भव्य सभेत रूपांतर झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरचे महत्त्व सांगणारी आठ कारणे सोशल मीडियावर पोस्ट केली.
ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
Source: Sarkarnama