राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील लक्ष्मी नगर कॉलनीत लग्नानंतर दहा महिन्यांत सुकुर्ती यादव हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनास्थळावरून दोन पानांची सुसाइड नोट सापडली असून, पतीच्या संशयामुळे नाते संपल्याचे तिने लिहिले आहे. तिचे वडील राकेश कुमार यांनी सासरच्या मंडळींवर हुंडाबळी व छळाचा आरोप करत तक्रार दिली आहे. पोलिसांनी पोस्टमार्टम व फॉरेन्सिक पुराव्यांसह तपास सुरू केला आहे.
नवविवाहितेचा संशयात गळफास; हुंडाबळीचा आरोप
Source: Mumbai Tak