शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र धोकादायक कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MPDA) कारवाई करण्यात आली असून, त्यांना एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. कोळी यांच्यावर धमकी, खंडणी आणि मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. कारवाईचे आदेश जारी झाल्यापासून ते फरार होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे उपनेते शरद कोळी यांना अटक
Source: Sarkarnama