बांग्लादेशातील टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर येथे दुर्गापूजेच्या तयारीदरम्यान सात मूर्तींची तोडफोड झाली. जामुर्की पश्चिमपाडा परिसरातील मंदिरात बुधवार रात्री ते गुरुवार पहाटे ही घटना घडली. जामुर्की आर्य समितीने पोलिसांकडे तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू आहे. मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून स्थानिक हिंदू समुदायात चिंता व्यक्त होत आहे.
बांग्लादेशात दुर्गापूजेआधी सात मूर्तींची तोडफोड
Source: Lokshahi Marathi