दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनादरम्यान दोन महिला पत्रकार आणि एका आंदोलक तरुणीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनात एआयएसए अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेताना ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तपास क्राइम ब्रांचकडे सोपवला आहे.
दिल्लीत महिला पत्रकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप; तपास क्राइम ब्रांचकडे
Source: BBC Marathi