पुण्यातील आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनात ८० टक्के राजकीय कार्यकर्त्यांची घुसखोरी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. पुण्याबाहेरील २०० ते २५० महागड्या गाड्यांचा व्हिडीओ दाखवत त्यांनी हे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांऐवजी रोहित पवार व काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्याचा दावाही त्यांनी केला.
रोहित पवारांच्या आंदोलनात विद्यार्थी नाहीत: नवनाथ बन
Source: Prahaar