प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी उलगुलान मोर्चा काढला असून, ते टिळक भवनात मुक्कामी थांबले आहेत. ‘शिक्षण वाचवा, मराठी शाळा वाचवा’सह आदिवासी विकास विभागाच्या मागण्या आणि विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनामागे आहे. टिळक भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून, विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पुढील आंदोलन आझाद मैदानात होणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबईत उलगुलान मोर्चा, टिळक भवनाबाहेर पोलिस बंदोबस्त
Source: Lokshahi Marathi