जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीत मोठी तफावत समोर आली आहे. वैद्यकीय पथकाने 263 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 211 जणांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणात फरक आढळला, तर 72 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे 92 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून विभागीय चौकशी सुरू आहे. दोष सिद्ध झाल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
जळगाव जिल्हा परिषदेत 92 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Source: Prahaar