महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा येथे हायप्रोफाईल तीन पत्ती जुगार अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. पोलिसांनी १६ संशयितांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि १० आलिशान चारचाकी वाहनांसह सुमारे ७३ लाख २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुजरातमधील व्यावसायिक व जमीन व्यवहाराशी संबंधित व्यक्ती जुगार खेळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरगाण्यात जुगार अड्ड्यावर धाड, ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Source: Prahaar