अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवडी शिवारात दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी २५ वर्षीय प्रवीण प्रकाश लांडगे याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात न नेता घरातच ठेवल्याने दोन दिवसांत त्याचा मृत्यू झाला. मृतदेह चार किलोमीटर अंतरावरील शेतात नेऊन जाळल्याचे तपासात उघडकीस आले असून, पोलिसांनी आई-वडिलांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले.
दारूच्या व्यसनावरून वाद; आई-वडिलांकडून मुलाची हत्या
Source: Prahaar