दैवी शक्ती व मंत्र-तंत्राचा भास दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोककुमार खरात उर्फ कॅप्टनचा जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळला. अपर सत्र न्यायाधीश नंदकिशोर मोरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७७ मध्ये हा निर्णय दिला. खरात २९ एप्रिलपासून कोठडीत असून त्याच्याविरुद्ध नाशिक परिसरात १७ गुन्हे नोंद आहेत.
भोंदू अशोक खरातचा जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाकडून फेटाळला
Source: Deshdoot