साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संमेलनात 'माहिती तंत्रज्ञान, AI आणि साहित्य' या विषयावर चर्चासत्रे झाली. AI मुळे दैनंदिन जीवन, करिअरच्या संधी आणि रोजगारावर होणारा परिणाम तसेच मराठी भाषा-साहित्याचे स्थान यावर मान्यवरांनी विचार मांडले.
डोंबिवलीत 11वे नांदी संमेलन; AI आणि साहित्यावर मंथन
Source: Lokshahi Marathi