महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून भाजप आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ६ ऑक्टोबर आहे. विधान परिषदेच्या ७८ सदस्यांपैकी ७ पदवीधर आणि ७ शिक्षक मतदारसंघांतून निवडले जातात.
विधान परिषद निवडणूक: काँग्रेस-भाजप उमेदवार जाहीर
Source: BBC Marathi